No menu items!
Wednesday, February 5, 2025

या व्यायाम मंडळाची तालीम पुन्हा झाली सुरु

Must read

सांबरा येथील महादेव व्यायाम मंडळाची तालीम पुन्हा सुरु करण्यात आली. गावातील मान्यवरांच्या हस्ते पूजा करून पुर्नप्रारंभ करण्यात आला. अध्यक्षस्थानी जेष्ठ मार्गदर्शक रुद्रागौडा पाटील होते. तालीम पुन्हा सुरु झाल्याने मल्लाच्या शड्डूचा आवाज घुमणार आहेत.
अनेक वर्षे बंद असलेल्या महादेव व्यायाम मंडळाच्या तालीमचा पुर्नप्रारंभ कार्यक्रम उत्साहात पार पडला. तत्पूर्वी लेझीम पथकाच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. पुंडलिक जोई आणि लक्ष्मण यड्डी यांच्या हस्ते छ. शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन, चौथऱ्याचे पूजन
ग्रा. पं.उपाध्यक्ष मारुती जोगाणी, राहुल गावडे, हनुमान मूर्तिचे पूजन मनोहर मुतगेकर आणि परशराम सावगावकर, महादेव मंदिरमध्ये शंकर यड्डी, डॉ. अमित चिंगळी यांनी पूजन केले. तालमीतील हनुमान मूर्ती आणि गद्याचे पूजन राष्ट्रकूल पदक विजेते पै. शिवाजी चिंगळे यांनी केले. आखाड्याचे पूजन रुद्रागौडा पाटील आणि माजी एपीएमसी सदस्य जोतिबा तिप्पनाचे यांनी केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते तालीमच्या आखाड्यात पुष्पवृष्टी करून पूजा करण्यात आली. हभप वाय. के. धर्मोजी, माजी जि. पं. यांनी नागेश देसाई, पै. नवीन पाटील यांनी विचार मांडले. सध्या सराव करत असलेले पै. मंथन, पै. केशव, पै. वैभव, पै. गौतम यांचा गौरव करण्यात आला. यापूर्वी घेण्यात आलेल्या बैठक (जोर) मारण्याच्या स्पर्धेतील विजेत्यांना रोख रक्कम देवून सन्मानित करण्यात आले. जेष्ठ नागरिक इराप्पा जोई, सिद्राई यड्डी, कंत्राटदार कल्लापा पालकर, देवाप्पा अप्पायाचे, ग्रा. पं. सदस्य भुजंग जोई, विक्रम सोनजी, शंकर यड्डी, मलापा कांबळे, माजी ता. पं सदस्य काशिनाथ धर्मोजी, राहुल गावडे, वैजू पालकर, मारुती चिंगळी, मोहन अष्टेकर, संजू गिरी, मोहन जाधव, शिवाजी पाटील, मोहन हरजी, कल्लाप्प सोनजी, मारुती नागनावर, वीरूपाक्षी कोलकार, मारुती हंचीनमनी, भीमसेन पालकर, प्रभात यड्डी, मनोहर जोई, लक्ष्मण सुळेभावी, भरमा चिंगळी, महेंद्र गोठे, शितलकुमार तिप्पानाचे, शिवानंद पाटील, भुजंग गिरमल, शिवाजी मालाई, कृष्णा जोई, मोहन हरजी, नितीन चिंगळी, प्रवीण ताडे, सिद्राई जाधव, बसू चिंगळी, महेश गिरमल आदी उपस्थित होते. यल्लाप्पा हरजी आणि भुजंग धर्मोजी यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कुस्ती कमिटी आणि महादेव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!