चलवेनहट्टी येथे श्री ब्रम्हलिंग मंदिरचा पहिला वर्धापन दिनाक ४ मे आणी ५ मे आसा दोन दिवस साजरा होणार आहे दिनांक ४ रोजी वेगवेगळ्या गावचे हारीपाठ होणार आहेत तसेच आठ वाजता तुरमुरी येथील प्रसिद्ध किर्तनकार बाळू भक्तिकर यांचे रात्री ८-०० किर्तन होणार आहे तसेच किर्तन सोहळा संपल्यावर नंतर गावातील स्थानिक भजनी मंडळाचे संगीत भजनाचे कार्यक्रम होणार आहेत. दिनांक ५ रोजी सकाळी सात वाजता ब्रम्हलिंग देवाला अभिषेक घालण्यात येणार आहे तसेच संगीत भजनाचा कार्यक्रम होणार आहे तसेच दुपारी १२-०० वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी संपुर्ण गावात उत्साहाचे वातावरण असून विविध धार्मिक कार्यक्रमासह महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ब्रम्हलिंग देवस्थान जिर्णोद्धार कमिटीने केले आहे
चलवेनहट्टीत ब्रम्हलिंग मंदिरचा पहिला वर्धापन दिन
