निपाणी येथील ट्रक चालक अमोल आनंद गुंडाळे (वय ३५) मूळ रा. कुंभार गल्ली व सध्या रा. दिवेकर कॉलनी, निपाणी हा दि. ९ सप्टेंबरपासून बेपत्ता झाल्याची फिर्याद पत्नी गीता अमोल गुंडाळे यांनी शहर पोलिसात दिली आहे. अमोल हा आपल्या पत्नीसमवेत बेळगाव नाका येथे एका फोटो स्टुडिओमध्ये फोटो काढण्यासाठी गेले होते. परत येत असताना दिवेकर कॉलनीच्या कोपऱ्यावर अमोल यांनी चल, मी आलो असे सांगून तो थांबला. रात्री उशिरापर्यंत तो घरी परतला ● नाही. अमोल याची उंची ५ फूट २ इंच, रंग गोरा, अंगाने सडपातळ असे त्याचे वर्णन असून त्याला मराठी व हिंदी भाषा अवगत आहे. कोणास माहिती आढळल्यास संबंधितांनी शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन उपनिरीक्षका उमादेवी यांनी केली आहे