भाऊबंदकीच्या जमिनीच्या वादातून चाकूने हल्ला केल्याने युवकाचा मृत्यू झाल्याची घटना बैलहोंगल तालुक्यातील अमटूर- बेविनकोप्प येथे घडली. केदारी यल्लाप्पा अंगडी (वय ४२) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.
गेल्या काही दिवसांपासून जमिनीवरून अंगडी भावांमध्ये वाद सुरू होता. यातूनच वाद होऊन केदार अंगडीवर चाकूने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणातील संशयित बाळाप्पा शिवानंद अंगडी (वय २१), शिवानंद बाळप्पा अंगडी (वय ५१) आत्मानंद शिवानंद अंगडी (वय १५) हे फरारी झाले आहेत. याप्रकरणी बैलहोंगल पोलिस स्थानकात नोंद झाली असून पोलिस संशयितांचा शोध घेत आहेत