बेळगावातील सुप्रसिद्ध एम स्टाईल डान्स अँड बिजनेस अकॅडमीच्या विद्यार्थिनीने देशात बेळगाव चे नाव उज्ज्वल केले आहे. नुकत्याच झालेल्या अमेरिकेतील ओरलांडो शहरांमध्ये जागतिक नृत्य अजिंक्यपद प्राप्त केल्याने तिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
प्रेरणा गोनबरे असे तिचे नाव असून उत्कृष्ट नृत्याविष्काराचा द्वारे सुवर्णपदक पटकाविले आहे.तसेच तिला सुवर्ण पदक आणि अडीच लाख रुपयांचे रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले आहे.
प्रेरणा ला नृत्य प्रशिक्षक महेश जाधव हे मार्गदर्शन करत असून सध्या ती केएलएस गोगटे कॉलेजच्या वाणिज्य शाखेच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे. तिने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
सध्याचा झालेल्या नृत्य स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवणारी प्रेरणा भारतातील पहिली स्पर्धक असल्याने बेळगाव करांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट ठरली आहे.