अचानक कारने पेट घेऊन जळून खाक झाल्याची घटना मानकापूर येथील पाटील मळ्याजवळ घडली आहे.
याबद्दल अधिक माहितीशी की मुलगी बघण्यासाठी बेळगावला गेलेला एजंट आपल्या ईरटीका कार मधून इंचलकरंजीकडे परत जात असताना ही घटना घडली आहे. सदर कार हातकणंगले येथील असून कार बघता बघता अचानक पेट घेऊन संपूर्ण कार जळून खाक झाली. पण यात गाडीचा ड्रायव्हर किंवा एजंट दोघांनाही कोणतीही जीवित हानी झाली नसून दोघे सुखरूप आहेत.
अचानक कारने पेट घेतल्याने बघण्यासाठी नागरिकांनी रस्त्यावर प्रचंड गर्दी केली होती. आग विझवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत कार संपूर्ण जळून खाक झाली होती. याप्रकरणी पुढील तपास सदलगा पोलीस करीत आहेत.
कारने घेतला अचानक पेट -जळून खाक
