हिंडलगा पंप हाऊस मधील पॅनल बोर्ड जळाल्याने पंप बंद झाला आहे त्यामुळे शहरात सुरळीत पाणीपुरवठा करण्यास व्यत्यय येत आहे. मात्र येत्या दोन दिवसात शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल अशी माहिती कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे .तसेच शहर आणि उपनगरांमध्ये पाणीपुरवठा करणाऱ्या बहुतांश जलवाहिन्यांना गळती लागली आहे. त्यामुळे या गळतीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. जलवाहिनीची दुरुस्ती करण्याकडे संबंधित प्रशासनाने कानाडोळा केला असल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
त्यातच आता पॅनल बोर्ड जळाल्याने देखील नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे .त्यामुळे सर्वसामान्यांचे नागरिकांचे हाल होत आहेत.