शिंदे मुख्यमंत्री असताना श्री मंगेश चिवटे यांच्या मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष प्रमुख नेतृत्वाखाली प्रथमच सीमा भागातल्या 865 गावांना वैद्यकीय सहायता निधीतून मदत मिळण्यास सुरुवात झाली.
त्याचबरोबर ही सुविधा आताच्या नवीन मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकार कडून तसेच चालत राहावी यासाठी श्री नाईक यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात आली. श्री नाईक यांना प्राचार्य आनंद आपटेकर कडून सीमा भागातल्या वैद्यकीय सहायता निधी ची सविस्तर माहिती देण्यात आली. त्याचबरोबर श्री नाईक यांनी येणाऱ्या पुढच्या महिन्यात नवीन प्रणाली संदर्भात माहिती दिली. 865 गावांना ती योजना तसेच चालू राहणार आणि त्यात अजूनही काही चांगले बदलणं आपण करू असे आश्वासन दिले.
ह्या सरकारकडून धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातून सुद्धा रुग्णांना मदत मिळणार याची माहिती दिली.
श्री नाईक यांच्याशी फोन वरून संपर्क साधून महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते श्री रमाकांत कोंडुसकर यांच्याशी सीमाभागात वैद्यकीय सेवा या संबंधित चर्चा करण्यात आली . श्री कोंडुस्कर यांनी त्यांना सर्वप्रथम ही निवड झाल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आणि विनंती केली की येणाऱ्या काळात ही योजना चांगल्या रीतीने आपल्या 865 गावांना मिळू दे . त्या विनंतीस मान देऊन श्री नाईक यांनी श्री रमाकांत कोंडुसकर यांना नक्कीच आपण सीमा भागावरती चांगल्या रीतीने वैद्यकीय सेवा देऊ असे आश्वासन दिले.
येणाऱ्या काळात नवीन प्रणाली ची माहिती लवकरात लवकर प्रसार माध्यमातून नागरिकांसाठी आपण पोहोचू असे श्री नाईक यांनी सांगितले . बेळगाव येथील अजून काही हॉस्पिटल मुख्यमंत्री सहायता निधीच्या पॅनलवरती घेण्यासाठी अर्ज केले आहेत त्यावरही लवकरात लवकर आपण विचारणा करू असं श्री नाईक यांनी सांगितले.