खडेबाजार येथील श्रीनिवास लॉजसमोर १५ फेब्रुवारी रोजी दुपारी फोंड्याचे माजी आमदार लवू मामलेदार यांचा खून करण्यात आला होता. दरम्यान, संशयित अमिर सोहेल
उर्फ मुजाहिदने न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला. मात्र न्यायालयाने तो फेटाळला आहे.
गोव्याचे माजी आमदारव निवृत्त पोलिस अधिकारी लवू सूर्याजी मामलेदार (वय ६७) यांच्या खून प्रकरणातील संशयिताचा जामीन न्यायालयाने फेटाळला आहे. येथील दहावे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश गुरुराज शिरोळ यांनी दि. १४ रोजी त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे.
लवू मामलेदार खून प्रकरण जमीन फेटाळला
