श्री वैजनाथ मंदिराचे पुजारी 32 वर्षीय प्रमोद प्रभाकर बर्वे (रा. देवरवाडी) यांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पुजारी बर्वे यांनी गेल्या बुधवारी 18 मार्च रोजी विष प्राशन केल्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र त्याचा फायदा न होता त्यांचे निधन झाले.