हिंडलगा दि.21:येथील बेळगाव सावंतवाडी रोडवर जय मल्हार इंटरप्राइजचे श्री शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दि. 19 रोजी उदघाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी श्री महालक्ष्मी देवी यात्रोत्सव संघाचे अध्यक्ष कृष्णा पावशे व उदघाट आप्पाजी चौगुले उपस्थित होते. याप्रसंगी फर्मचे मालक रविंद्र (बंटी) सरप यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीचे पूजन करण्यात आले. फीत सोडून उदघाटन करण्यात आले. यावेळी प्रकाश बेळगुंदकर( निवृत्त मुख्याध्यापक) यानी स्वागतपर भाषण केले. शुभेच्छापर भाषणे रमाकांत पावशे, उदय नाईक, बबन हिंडलगेकर यानी केली.
कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र कुद्रेमनीकर, यल्लाप्पा काकतकर, उदय तु. नाईक,चित्रपट निर्माते डॉ. गणपत पाटील, रवींद्र कोकितकर व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
हिंडलगा येथे जय मल्हार इंटर प्राइजचे उदघाटन संपन्न
