हिजाब आणि बुरखा घालून पूर्वतयारी परीक्षेला उपस्थित राहू न दिल्याने लिंगराज महाविद्यालयातील मुस्लिम विद्यार्थिनींनी आज सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात निदर्शने केली.
यावेळी विद्यार्थ्यांनी म्हणाल्या की, धार्मिक नियमांचे पालन करणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. अनेक वर्षांपासून मुस्लिम मुली हिजाब आणि बुरखा घालतात मात्र आता वर्गात प्रवेश बंदी करण्यात येत आहे .त्यामुळे आमचे शैक्षणिक नुकसान होत आहे .
यावेळी वर्गात बंदी घालण्याचे कारण विचारले असता त्या म्हणाल्या की आम्ही भारतीय आहेत आणि शिक्षण घेणे हा आमचा हक्क आहे मात्र आता तो छुप्या हेतूने हिरावून घेतला जात आहे.त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला द्यावा यासाठी निदर्शने करत असल्याचे मुस्लिम विद्यार्थांनी सांगितले .