शिमोगा येथील बजरंग दल कार्यकर्ते हर्ष यांच्या हत्येचा निषेध करण्यासाठी, विश्व हिंदू परिषद, श्रीराम सेने आणि बजरंगदल या हिंदू संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे निदर्शने करून सरकारला त्या नराधमांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली.
यावेळी चन्नम्मा सर्कलपासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यत निषेध रॅली काढण्यात आली होती .यावेळी सर्व हिंदू संघटनां एकत्र आल्याने चन्नम्मा सर्कल या मार्गावरून जाणारी वाहने अन्य मार्गाने वळविण्यात आली होती .
तसेच याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून याकरिता मोठा पोलिस फाटा तैनात करण्यात आला होता.यावेळी हिंदू संघटनांनी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात सरकारला हर्षच्या हत्येमागे एकाही व्यक्तीला सोडू नये, अशी विनंती केली .
तसेच अशा बेकायदेशीर कृत्यांसाठी कठोर शिक्षा केली जावी जेणेकरून हिंदूंच्या विरोधात अशी कृत्ये पुन्हा होणार नाहीत अशी मागणी केली .यावेळी सर्वानी त्या घटनेचा तीव्र निषेध केला .आणि हर्षच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, आणि हर्ष ला न्याय मिळाला पाहिजे अशी मागणी निवेदनाद्वारे केली.