महाशिवरात्रीचे औचित्य साधून शहरात आज विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे .शहरातील विविध शिवमंदिरात आज विशेष पूजा अभिषेक आणि आरती करण्यात आली. तसेच विविध मंदिरात हर हर महादेव चा गजर शिवा नामस्मरण शिव भजन पारायण जागरण यासह इतर कार्यक्रम झाले.
येथील कपिलेश्वर मंदिरात शिवरात्री निमित्त आकर्षक विद्युत रोषणाई करून सजावट करण्यात आली आहे .यावेळी मंदिरात रात्री दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती कपिलेश्वर मंदिराबरोबर शहरातील मिलिटरी महादेव ,शहापूर मुक्तिधाम, गोवावेस ,पंचवटी रिक्षा स्टँड ,शिवमंदिर खासबाग शिवमंदिर ,शनिवार खुट , महादेव आर्केड ,शहापूर खडे बाजार, गणेशपुर
अयोध्या नगर ,आनंदनगर ,विजयनगर ,शाहू नगर आदी ठिकाणी असणाऱ्या शिवमंदिरात शिवरात्री निमित्त विविध धार्मिक कार्यक्रम झाले.तसेच भाविकांनी देखील शिवाचे दर्शन घेऊन शिवरात्र उत्साहात साजरी केली .