ग्रामीण भागातील युवकांना रोजगार मिळावा या उद्देशाने जीवन संघर्ष फाउंडेशनच्यावतीने हिंडलगा येथे एम्पलयोंमेन्ट ब्युरो ऑफिस सुरू करण्यात येणारआहे. याची माहिती जीवन संघर्ष फाऊंडेशनचे संस्थापक डॉ गणपत पाटील आणि माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळ्ळी यांनी जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांना भेटी प्रसंगी दिली.
कोरोना काळात अनेक युवकांच्या नोकर्या गेल्या आहेत. त्यामुळे कुटुंबियांना सांभाळणे अवघड बनले असून अशा युवकांना रोजगार मिळावा यासाठी जीवन संघर्ष फौंडेशनच्या वतीने हिंडलगा येथे लेमन लीफ हॉटेल जवळ एम्प्लॉयमेंट ब्युरो सुरू करण्यात येणार आहे.
येत्या आठ दिवसात सदर एम्प्लॉयमेंट ब्युरो नोकरी शोधणाऱ्यांच्या सेवेत हजर होणार आहे .तरी ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील युवकांनी आणि युवतींनी नोकरीच्या शोधात इतरत्र न फिरता जीवन संघर्ष फाऊंडेशनचे संस्थापक डॉ गणपत पाटील यांनी मिळवून दिलेल्या संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.