बेळगावसाठी तीन महत्त्वाच्या घोषणा मुख्यमंत्र्यांनी आज राज्य अर्थसंकल्पात केल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने किडवाई कॅन्सर सेंटर ,बहुमजली वसतिगृह आणि नव्या कृषी महाविद्यालयाच्या घोषणेचा समावेश आहे .
त्याच प्रमाणे अर्थसंकल्पात मराठा समाजाच्या विकासासाठी पुन्हा 40 कोटींची तरतूद करण्यात आली आहे .मागील वेळी 50 कोटींची तरतूद करण्यात आल्याची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी केली होती.
आता बेळगावसाठी मुख्यमंत्र्यांनी विधानसौध मध्ये 2022 आणि 23 चा अर्थसंकल्प सादर केला आहे.या अर्थसंकल्पात महत्त्वाच्या तरतुदी करण्यात आल्या असून बेळगाव साठी विशेष तरतूद करण्यात आली आहे.
यामध्ये बेळगावात स्थापन होणाऱ्या किडवाई कॅन्सर सेंटर साठी 50 कोटींची तरतूद करण्यात आली आहे .तसेच बेळगाव मध्ये उभारले जाणारे हजार क्षमतेचे बहुमजली वसतिगृह आणि अथणी तालुक्यात नव्या कृषी महाविद्यालयाची स्थापना या तरतुदी बेळगावसाठी करण्यात आलेल्या आहेत.