आपण आज आंतरराष्ट्रीय महिला दिवस जरी साजरा करत असलो आणि महिलांच्या सन्मानाविषयी बोलत असलो तरी महिलांचा सन्मान कशा पद्धतीने करावा हे साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवरायांनी खूप चांगल्या पध्दतीने शिकवले आहे, असे प्रा मनिषा नेसरकर यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले.
इथे सत्कारमूर्ती सोडले की सगळी पुरुष मंडळी उपस्थित आहेत. म्हणजे पुरुषांनी महिलांचे सामर्थ्य ओळखून आज आमच्यासारख्या महिलांचा सन्मान केला त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त जायंट्स मेनच्या वतीने पाच कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला.
सरस्वती वाचनालयाच्या अध्यक्षा निवृत्त प्राध्यापिका स्वरूपा इनामदार, राणी चन्नम्मा विद्यापीठाच्या प्रा. मनिषा नेसरकर, पोलीस उपनिरीक्षक राजश्री कदम, कर्तबगार महिला उद्योजिका रत्ना होसमठ,स्वतः काबाडकष्ट करून आपल्या मुलींना शिक्षण देणाऱ्या कुसुम नाईक या पाच महिलांचा शाल,स्मृतिचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन अनुक्रमे विनोद गायकवाड, अनंत जांगळे, पी आर कदम, मोहन कारेकर आणि संजय पाटील यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला.
तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात जायंट्सच्या प्रार्थनेने झाली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत विभागीय संचालक मदन बामणे आणि प्रास्ताविक फेडरेशन सचिव अनंत लाड यांनी केले.
यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष संजय पाटील, उपाध्यक्ष शिवकुमार हिरेमठ, सुनिल मुतगेकर आणि सचिव विजय बनसुर उपस्थित होते.
सर्वच सत्कारमूर्तीनी सत्काराप्रति कृतज्ञता व्यक्त केली.
अध्यक्षीय समारोप अध्यक्ष संजय पाटील यांनी केला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फेडरेशन संचालक शिवराज पाटील तर आभार विजय बनसुर यांनी मांडले.
कार्यक्रमाला बहुसंख्येने जायंट्स सदस्य उपस्थित होते.