बेळगाव
कोरोनाचा फैलाव आणखी वाढत असल्याने प्रशासनाने सर्व ती खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. तसेच शनिवार आणि रविवार देखील विकेंड कर्फ्यू जारी करण्याचा निर्णय घेत देखील घेतला आहे.याच बरोबर आता महापालिकेने विना मास्क फिरणायांवर कारवाई करण्याची मोहीम हाती घेतली आहे.
महानगर पालिकेचे आरोग्य विभागाचे कर्मचारी ठिकाणी शहरात तैनात करण्यात आले असून विना मास्क फिरणाऱ्यांकडून दंड जमा करत आहेत. त्यामुळे विना मास्क फिरणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे.
कालपासून महापालिकेने विना मास्क फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा सुरू ठेवला आहे मंगळवारी महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने खासबाग आरपीडी सर्कल चन्नम्मा सर्कल याठिकाणी विना मास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून दंड आकारला.
या दंडापोटी महापालिकेकडे पंधराशे रुपये काल जमा झाले. तर आज सकाळपासून देखील पालिकेने ही कारवाई करण्यास कंबर कसली असून संध्याकाळपर्यंत कालच्या पेक्षा जास्त दंड जमा होण्याची शक्यता आहे.