आज काही राज्यातील निवडणूक निकालाचा महत्वाचा दिवस आहे. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर, पंजाब आणि गोव्याच्या विधानसभा निवडणूक निकालाचा कर्नाटकवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दक्षिणेतील राज्यात डिसेंबर २०२२ मध्ये गुजरातबरोबर निवडणुका होणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे. यामुळे आजचे निकाल पुढचे परिणाम निश्चित करणारे असतील.
गुरुवारी भाजपची कामगिरी कशी होते, यावर हे अवलंबून असले तरी भाजप पक्षातील काही नेते अशी परिस्थिती नाकारत आहेत. “बोम्मई सरकार 2023 मध्ये आपला कार्यकाळ पूर्ण करणार आहे. म्हणून गुजरातबरोबर स्नॅप पोलसाठी जाण्याने फारसा फायदा होत नाही. या पाच राज्यांमध्ये आमचा पक्ष जिंकला तर कर्नाटकातही नंतर तेच होईल,’ अशी प्रतिक्रिया भाजप नेते देत आहेत.
हिजाबचा मुद्दा, शिवमोगा येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्याची हत्या अशा वातावरणात लवकर निवडणुका झाल्यास सरकारची कामगिरी रोखता येईल, असे आणखी एका नेत्याने सुचवले असले तरी.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी आक्रमक प्रचार करत भाजपची निवडणूक रणनीती आखली असून, त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांकडे राज्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. इतर राज्यांसाठीही भाजप अशीच रणनीती अवलंबण्याची शक्यता आहे.
जर पक्षाने बऱ्यापैकी जागा घेऊन एक-दोन राज्ये जिंकली आणि मागील निवडणुकांपेक्षा आपली संख्या सुधारली, तर ते कर्नाटकातील परिस्थिती चांगली होऊ शकते.
जर पाच राज्यांतील काँग्रेसची कामगिरी खराब राहिली, तर त्याचा फायदा कर्नाटकात भाजप उठवू शकते. दरम्यान पाच राज्यांच्या निकालावर कर्नाटकात कधी आणि कशी निवडणूक घ्यावी हे समजू शकणार आहे.