सेंट जर्मन इंडियन हायस्कूल येथे निरोप समारंभ आणि बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन बुधवार दिनांक 9 मार्च रोजी करण्यात आले होते.
नवजीवन हॉस्पिटलचे डॉक्टर सतीश चौलीगेर आणि के एस डी ए डी कॉलेजचे उमेश चिंगप्पागौडर यांचा सत्कार करण्यात आला.तसेच प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ झाला.
यावेळी या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून रिजवान नवलगेकर आणि जीवन संघर्ष फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गणपत पाटील, रोटरी क्लब दर्पणच्या अध्यक्षा पुष्पा राव आदी उपस्थित होते.
तसेच युक्रेनमध्ये मृत्यू पावलेल्या भारतीय नागरिकांना आणि गानकोकिळा लता मंगेशकर यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.