महाराष्ट्र बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर या ठिकाणी रहात असलेले दांपत्य येथील बेळगाव शहरातील भेंडी बाजार मध्ये आढळले . यावेळी विजय निंबाळकर आणि त्यांच्या पत्नी मानसी निंबाळकर यांनी या दोघांची विचारपूस केली आणि त्यांना मदत मिळावी याकरिता सामाजिक कार्यकर्ते आणि फेसबुक फ्रेंड सर्कल चे संतोष दरेकर आणि अवधूत तुडयेकर यांना याबाबत माहिती दिली.
यावेळी त्यांनी सदर दांपत्यांना मदत मिळावी याकरिता घटनास्थळी दाखल झाले. तसेच त्यांची विचारपूस केली असता त्यांच्याकडे गावी परतण्यासाठी पैसे उपलब्ध नसल्याचे लक्षात आले .याबाब त्यांनी पोलीस उपायुक्त रविंद्र काशिनाथ गडादी यांना याची माहिती दिली .आणि पोलीस पथकाकडून या कुटुंबाची चौकशी त्यांना रेल्वेस्थानकावर पाठविण्यात आले.
त्यांना गावी परतण्यासाठी मिरज ट्रेन उपलब्ध नसल्याने त्यांची तात्पुरती रेल्वेस्थानकावर राहण्याची सोय करण्यात आली तसेच या ठिकाणी त्यांना जेवणाची सोय केल्याने त्यांनी त्यांच्या मदतीसाठी आलेल्या सर्वांचे आभार मानले.सदर दाम्पत्य उद्या मिरज रेल्वेने आपल्या गावी परतणार आहेत .