महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमा अंतर्गत वडगांव येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळा क्र. ३१ मध्ये महाराष्ट्र एकीकरण युवा समिती कडून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.
प्रति वर्षी मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने पहिल्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच इतर गरजू विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते त्या अंतर्गत आज वडगांव येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळा क्र. ३१ मध्ये साहित्याचे वाटप करण्यात आले.
युवा समिती पदाधिकारी प्रतिक पाटील यांनी युवा समिती च्या शैक्षणिक उपक्रमाची माहिती दिली. युवा समितीतर्फे ज्ञानेश्वर मन्नुरकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
शिक्षक श्री. एम. व्हाय. चव्हाण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर, शिक्षक वर्ग आणि विद्यार्थ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.
सदर कार्यक्रमाला शाळेतील शिक्षिका दिपाली जाधव, एन. वी. राजपूत, एस. पी. पाटील, शिक्षक के. सी. कुगजी आणि इतर शिक्षकवर्ग, विद्यार्थी तसेच महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने दिलीप नाईक, अनंत आजरेकर, अमोल सप्रे, ओमकार येळ्ळूरकर, महेश मन्नूरकर, चेतन चव्हाण, प्रतीक मनवाडकर, आशिष गडकरी, जोतिबा पाटील हे उपस्थित होते.