कॅन्टोन्मेंट मैदानाचा विकास होणार आहे.पुण्याची कंपनी या ठिकाणी सुविधा पुरविणार असल्याने त्या बदल्यात कंपनीला मैदान वापरण्याची मुभा देण्यात आली आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्ड शाळेचे मैदान वीस वर्षाच्या करारावर पुण्याच्या कंपनीला देण्यात आले आहे .त्या ठिकाणी ही कंपनी सुविधा निर्माण करणार असून त्या बदल्यात मैदानाचा वापर कंपनीला करता येणार आहे.
सदर कॅन्टोन्मेंट मैदानाचा वापर व्यवसायिक प्रशिक्षणासाठी मोफत करण्याची मुभा देण्यात आली आहे .तर कंपनीने निर्माण केलेल्या सुविधांचा वापर कॅन्टोन्मेंट शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत घेता येणार आहे. सदर कंपनीने दीड कोटी रुपये खर्च करून मैदानाचा विकास सुरू केला आहे.
मराठी इंग्रजी उर्दू शाळेच्या कॅन्टोन्मेंट या विद्यार्थ्यांना या मैदानाचा वापर फक्त शाळेच्या वेळेत करता येणार आहे. सकाळी कॅन्टोन्मेंट शाळेच्या विद्यार्थ्यांना हे मैदान उपलब्ध असणार असून सायंकाळी पुण्याची कंपनी खेळात करिअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना ठरावीक रक्कम आकारून प्रशिक्षण देणार आहे.
शहराबरोबरच ग्रामीण भागातील मुलांना खेळात आपले करियर घडविण्याकरिता प्रोत्साहन देण्यासाठी तसेच खेळात उत्तेजित मुलांना विशेष प्रशिक्षण देण्याकरिता राज्य व राष्ट्रीय स्तरावर घेऊन जाण्यासाठी या ठिकाणी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
कॅन्टॉन्टमेन्ट बोर्ड चे तत्कालीन सीईओ बर्चस्वा यांच्या कार्यकाळात कॅन्टोन्मेंट बोर्ड शाळेचे मैदान विकासासाठी वीस वर्षाच्या करारावर पुण्याच्या कंपनीला देण्यात आले आहे. त्यामुळे कंपनी बरोबरच विद्यार्थ्यांना देखील या मैदानात उपलब्ध करण्यात आलेल्या सुविधांचा वापर करता येणार आहे.