भरतेश एज्युकेशन ट्रस्टच्या व्यवस्थापनाने 22 मार्च रोजी हलगा येथील श्रीमती जे. आर. दोड्डनावर हायस्कूल येथे आपल्या तिसर्या अटल टिंकरिंग लॅबचे उद्घाटन केले. या प्रयोगशाळेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे श्री.अरुण शहापुर, एमएलसी-कर्नाटक, श्री. परमेश्वर हेगडे, अध्यक्ष – संत मीरा शाळा, अनगोळ, श्री. बसवराज नलतवाड, डीडीपीआय, व श्री. आर. पी. जुट्टानावर, बीईओ-ग्रामीण हे सन्माननीय पाहुणे होते. श्री. श्रीपाल एस. क्षेमलापुरे, श्री. प्रकाश उपाध्ये, श्री. बाहुबली कादेमणी, श्री. विनोद एस. दोड्डनावर, श्री. अशोक दानवडे, श्री. हिराचंद कलमणी आणि भरतेशचे इतर गव्हर्निंग कौन्सिलचे सदस्यही उपस्थित होते.
ही प्रयोगशाळा स्वतःमध्ये अद्वितीय आहे. कारण उच्च रिझोल्यूशन आणि ऑटोमेशनसह “की स्टेशन” आणि “दुर्बिण” स्थापित केली आहे. व्यवस्थापनाने अभिमानाने जाहीर केले की पुढील पाच वर्षांत आम्ही आमच्या भरतेश अटल टीकरिंग लॅबमधून उपग्रह प्रक्षेपित करण्याचा विचार करीत आहोत. श्री. नितीन रेवणकर, लीड कन्सल्टंट (मेंटर) – एलएलएफ यांनी लॅबच्या स्थापनेदरम्यान आपली मौल्यवान माहिती दिली.शाळांमधील विद्यार्थी, कर्मचारी आणि पालक उपस्थित होते.