ज्येष्ठ पत्रकार दिलीप कुरुंदवाडे यांनी आपल्या मातोश्रीच्या स्मरणार्थ एस एस फाऊंडेशनची स्थापना केली आहे. सदर फाउंडेशन च्या उपक्रमाचा शुभारंभ काल 3 एप्रिल रोजी जिल्हा माहिती व प्रसिद्धी खात्याच्या कार्यालयामध्ये करण्यात आला.
यावेळी अकाली निधन पावलेल्या छायाचित्रकार दिवंगत परशराम गुंजीकर यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याबरोबरच त्यांच्या आई-वडिलांना वृद्धापवेतन आणि पत्नीला विधवा वेतनात मंजुरी मिळवून देण्यात आली.
तसेच वृत्तपत्र छायाचित्रकार दिवंगत चेतन कुलकर्णी यांच्या कुटुंबियांना देखील मदत देण्यात आली तसेच पत्रकार महांतेश बाळीकाई हे आजारी असल्याने यांनादेखील वैद्यकीय उपचाराकरिता मदत देऊ केली.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार दिलीप कुरुंदवाडे यांनी आपल्या आईच्या स्मरणार्थ फाउंडेशन स्थापनेचा उद्देश स्पष्ट केला. तसेच इन बेळगाव चे संपादक राजशेखर पाटील यांनी सदर फाऊंडेशनला 51 हजार रुपयांची देणगी जाहीर केली.
याप्रसंगी माहिती आणि प्रसिद्धी खात्याचे उपसंचालक गुरुनाथ कडपुर पत्रकार विलास जोशी माजी महापौर विजय मोरे पत्रकार सहदेव माने छायाचित्रकार डी बी पाटील श्रीकांत कुबकट्टी अरुण पाटील पुंडलिक बाळोजी यांच्यासह पत्रकार सदस्य आणि मृतांचे कुटुंबीय उपस्थित होते.