आझादीका अमृतमहोत्सव आणि काकडे फौंडेशनच्या सातव्या वर्धापनानिमित्त गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर बेळगावातील सुप्रसिद्ध रांगोळी आर्टिस्ट अजित महादेव औरवाडकरांचा सत्कार करण्यात आला.रांगोळी या हिंदुस्थानच्या पारंपरिक कलेच्या माध्यमातून विविध कलाकृती रेखाटणारे अजित औरवाडकरजी सर्वांना परीचीत आहेत.काकडे फौंडेशनच्यावतीने सौ.उज्वला काकडे,किशोर काकडे यांनी शाल-भेटवस्तू-पुष्प, सत्कारमुर्तिंचे छायाचित्र असलेले स्मृती पर्ण,फळ-करंडी, सम्मानपत्र आदि देऊन सत्कार केला.
सौ.शोभा औरवाडकरांचेही यावेळी कौतुक करण्यात आले.प्रारंभी सुश्री.श्रध्दा औरवाडकर व सौ.रेखा मडीवाळनी सुंदर प्रार्थना सादर केली.श्री. परशुराम मडीवाळनी सूत्रसंचालन, स्वागत व आभार मानले. किशोर काकडेंनी फौंडेशनच्या कार्याचा परीचय करुन दिला व औरवाडकर कुटंबियांचे आभार मानले.हा छोटेखानी कार्यक्रम शनिवार दि.02.04.2022 रोजी श्री.औरवाडकरांच्या वडगांव येथील निवासस्थानी (ज्योती स्टुडिओत) निवडक मित्र व नातेवाईकांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
अजित औरवाडकरांनी काकडेफौंडेशनचे आभार मानत,आपला आजवरचा रांगोळी रेखाटनाचा प्रवास मांडला.आपली निवडक रांगोळी-चित्रेही यावेळी मांडली होती. आझादीका अमृतमहोत्सवाचे औचित्य साधत काकडे फौंडेशननी 75 कर्तबगार नागरिकांचा सम्मान करण्याचे ठरवले असून त्यातलाच हा एक कार्यक्रम आहे असे काकडेनी सांगितले.दि.21.3.2015 रोजी गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर काकडे फौंडेशनची स्थापना करण्यात आली होती.
राष्ट्र गीता नंतर औरवाडकर कुटुंबियानी आयोजित केलेल्या अल्पोपहाराने सांगता झाली.यावेळी माजी सैनिक व सेवानिवृत्त बीमा अधिकारी श्री.लक्ष्मण बन्ने,सेवानिवृत्त शिक्षक राजाराम संकपाळ, सेवानिवृत्त राज्य पोलिस निरीक्षक प्रकाश संपगाव, मातोश्री अक्काताई,बंधु सोमशेखर,सौ.प्रियांका, अजिंक्य औरवाडकर ,मित्र परिवार आदी मंडळी उपस्थित होती.