कोळीकोप येथील गवंडी कामगार बाळु फकीरा नाईक हे कामावरती स्लॅब घालतेवेळी काँक्रीट मशीन वरून दुसऱ्या मजल्यावरून खाली पडले यावेळी त्याचा हात पाय आणि कंबर मोडल्याने त्यांना उपचाराकरिता विजय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
यावेळी बाळू नाईक यांच्यावर जवळपास महिनाभर उपचार झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. या घटनेची माहिती समजल्यावर ग्रामीण च्या आमदार लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी बाळु नाईक यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.
बाळू नाईक यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्यांच्या उपचाराकरिता आलेल्या खर्च मुख्यमंत्री फंडातून मंजूर करून देण्याची ग्वाही यावेळी लक्ष्मीताई हेब्बाळकर यांनी दिली. तसेच त्यांची विचारपूस करून त्यांना तंदुरुस्त राहण्याकरिता फळे देखील दिली.