मुतगे येथे हनुमान यात्रे निमित्त श्री हनुमान कुस्ती कमिटी गाव सुधारणा मंडळ ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने रविवारी 10 रोजी दुपारी 2 वाजता जक्कन तलाव येथे कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित करण्यात आले आहे.
प्रथम क्रमांकाची कुस्ती भोलु पंजाब पंजाब केसरी वि अक्षय शिंदे पुणे दुस-या क्रमांकाची कुस्ती कार्तिक काटे वि संजय कुमार हरीयाणा तिस-या क्रमांकाची कुस्ती संगमेश बिराजदार वि नारायण सांगली यांच्या रंगणार आहे रोहीत कंग्राळी वि सुनिल कवटेपिटान किरण कोगे वि किर्ती कुमार कार्वे विक्रम शिनोळी वि गणेश कोल्हापूर पवन चिकदीनकोप वि परशुराम नंदीवाळे सुशांत कंग्राळी वि विजय चिमड संकल्प कंग्राळी वि पंकज चापगांव प्रविण निलजी वि अजिंक्य कोल्हापूर मैदानात एकूण 50 कुस्त्या होणार असून विजेत्या मल्लांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात येणार आहे