लोकमान्य ग्रंथालय आणि बुकलव्हर्सक्बतर्फे विद्यार्थ्यांसाठी सुट्टीतील वाचन उपक्रमाचा औपचारिक प्रारंभ मंगळवार दि.05.04.22 रोजी सकाळी “उन्हाळ्याच्या सुट्टीत छान छान वाचा या सुट्टीतील वाचन उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.
सदर कार्यक्रम लोकमान्य ग्रंथालयातील सानेगुरुजी सभागृहात पार पडला . यावेळी कार्याध्यक्ष श्री.जगदीश कुंटे, बुलकचे सदस्य सर्वश्री.सुधीर जोगळेकर, माधव कुंटे, चैतन्य हलगेकर, सौ.मंजिरी करगुप्पीकर,किशोर काकडे,ग्रंथपाल सौ.रंजना कारेकर ,किशोर रेडकर आदि उपस्थित होते.
या मोफत योजनेची कल्पना, उद्देश जगदीश कुंटे, मंजिरी करगुप्पीकर यांनी विषद केला 1 एप्रिल पासूनच विद्यार्थी या योजनेचा लाभ घेऊ लागले आहेत. तसेच ही योजना 31 मे पर्यंत उपलब्ध असेल. एकूण 5 विद्यालयातील 20 विद्यार्थी सध्या याचा लाभ घेत असून आणखीन विद्यार्थी अपेक्षित आहेत.
लोकमान्य ग्रंथालयाच्या स्टाफसह बुकलव्हर्सक्बचे सदस्य विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करतील व त्यांच्याशी पुस्तक, छंद याविषयी गप्पा गोष्टी करतील.एखादा चित्रपट ही दाखविला जाईल.विद्यार्थ्यांच्यात वाचन संस्कृती वाढावी हा विचार या योजनेपाठी असल्याचे यावेळी सांगण्यात आले .