भारतीय जनता पक्षाच्या 42 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित जुन्या कार्यकत्याचा भव्य असा सत्कार समारंभ करण्यांत आला.यावेळी बेळगांव ग्रामीण मधील आंबेवाडी येथील एक जुने वयोवृद्ध कार्यकर्ते श्री परशराम चोपडे व श्री दशरथ कोलते पक्षासाठी एकनिष्ठ काम करताहेत .तसेच सर्व कार्यकर्त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत गेली 20 वर्ष परिश्रम घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी केलेले कार्य उल्लेखनीय आहे .त्यामुळे त्यांचा सत्कार भारतीय जनता पार्टी माजी अध्यक्ष श्री विनय विलास कदम यांच्या हस्ते करण्यांत आला.
यावेळी पूज्यनीय स्वर्गवासी श्री अटलजींनी बोललेल वाक्य “अंधेरा छटेगा, सूरज निकलेगा, कमल खिलेगा” आज खरे होत आहे.आज भारतीय जनता पक्ष हा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगातील सर्वात मोठा पक्ष असल्याचे प्रतिपादन करण्यात आले.
याप्रसंगी आंबेवाडी गावातील एकनिष्ठ निष्ठावंत कार्यकर्ते मल्लाप्पा बेळगांवकर, राहुल भातकांडे, राजू सांब्रेकर, पिंटू तरळे, संतोष लोहार, विजय पाटील,मंलव्वा जंगम, उमेश चौगुले, लक्ष्मण चौगुले, मारुती चौगुले,रेवानी चौगुले, लक्ष्मण चोपडे, रोहित चोपडे व नागरिक कार्यकर्ते उपस्थित होते.