बेळगाव तालुक्यातील कर्ले येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मारुती गल्लीच्या वतीने खास पांडुरंग हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने बुधवार दी 13 रोजी सायंकाळी 7 वाजता भव्य खुल्या रेकॉर्ड डान्स स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.
प्रथम क्रमांकाला – सहा हजार रुपये, दुसरे – पाच हजार, तिसरे- चार हजार , चौथे – तीन हजार, तर पाचवे – दोन हजार रु अशी बक्षिसे आहेत.तर प्रवेश फी चारशे रु आहे. यावेळी निवृत्त शिक्षक, सैनिक, ग्रा प सदस्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या स्पर्धकांनी स्पर्धा आयोजकांशी संपर्क करावा असे कळविण्यात आले आहे