ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना काम मिळावे या उद्देशाने हिंडलगा आंबेवाडी क्रॉस नजीक जीवन संघर्ष फाउंडेशन च्या वतीने एम्प्लॉयमेंट ब्युरो चा शुभारंभ आज जिल्हाधिकारी यांची हिरेमठ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सदर कार्यक्रम हॉटेल लेमन लीफ खाली आंबेवाडी क्रॉस हिंडलगा येथे सायंकाळी चार वाजता आयोजित केला गेला आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी एमजी हिरेमठ, कमिशनर ऑफ लेबर डिपार्टमेंट आक्रम पाशा, शंकरगौडा पाटील, भरमु अण्णा पाटील , माजी आमदार परशुराम भाऊ नंदिहळ्ळी, डॉक्टर देवेगौडा डॉक्टर रवी पाटील यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
तरी या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन जीवन संघर्ष फाऊंडेशन आणि बेळगाव केसरी न्यूजचे संस्थापक डॉक्टर गणपत पाटील यांनी केली आहे.