भाग्यनगर येथील रामनाथ मंगल कार्यालयात श्री संप्रदाय सेवा मंडळाच्या वतीने रविवार दिनांक 17 एप्रिल रोजी श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुका दर्शनाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
सदर पादुका दर्शन सोहळ्यात संपूर्ण दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.
पादुका दर्शन सोहळ्यानिमित्त रविवारी सकाळी नऊ ते दहा दरम्यान सत्संग कार्यक्रम पार पडेल. त्यानंतर सकाळी दहा ते अकरा वाजेदरम्यान श्रींच्या पादुकांची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे.अनगोळ श्रीहरी मंदिर येथून सुरू होणाऱ्या पादुका मिरवणुकीची सांगता रामनाथ मंगल कार्यालय येथे होणार आहे .त्यानंतर सकाळी 11 वाजता पादुका व गुरुपुजनाचा सोहळा पार पडेल. दुपारी दीड वाजता सामूहिक आरती सोहळा संपन्न होईल. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.
महाप्रसाद कार्यक्रमानंतर श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज ऑनलाईन व्दारे पादुका दर्शन सोहळ्यात सहभागी झालेल्या भक्तांना गुरू उपदेश करणार आहेत. गुरु उपदेशानंतर भक्त दीक्षा आणि दर्शन सोहळा संपन्न होईल. सायंकाळी पुष्पवृष्टी ने पादुका दर्शन सोहळ्याची सांगता होणार आहे.
पादुका दर्शन सोहळ्याच्या अधिक माहितीसाठी 9902496020,9448907455,8123495275 या क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन, श्री संप्रदाय सेवा मंडळाचे जिल्हा अध्यक्ष अरविंद टोणे व निरीक्षक बाळकृष्ण सायनेकर यांनी केले आहे.