मंगळवार दि.12 एप्रिल रोजी , दिल्ली येथे होणाऱ्या मराठा सेवा संघाच्या पहिल्या महा अधिवेशनास सांकवाळ ,गोवा येथून मराठा सेवा संघ, गोवा राज्याचे प्रदेशाध्यक्ष शिवश्री रामचंद्र पाटील , प्रभारी शिवश्री बळवंत पाटील, केशवराव भोसले कला-संस्कृती, कक्षाचे ,प्रदेशाध्यक्ष शिवश्री भारत पाटील , जिजाऊ ब्रिगेड ,गोवा राज्य प्रदेशाध्यक्ष शिवमती समृद्धी पवार आणि दक्षिण गोवा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष-शिवश्री स्वप्नील पवार आदी मान्यवर रवाना झाले आहेत.
दिल्लीला जाणार्या संपूर्ण टीमला निरोप देण्यासाठी मराठा वधू-वर सुचक कक्ष, गोवाच्या प्रदेशाध्यक्षा शिवमति मनीषा पाटील, अखिल भारतीय मराठा जागृती मंच, गोवा आणि मराठा सेवा संघ, गोवाचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.
प्रदेशाध्यक्ष रामचंद्र पाटील यांच्या निवासस्थानी निरोप समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर मराठा जागृती मंचचे अध्यक्ष शिवश्री नागराज वाबळे , उपाध्यक्ष शिवश्री कल्लाप्पा पाटील तसेच पदाधिकारी शिवश्री नामदेव शिंदे ,राजाराम गावडे ,विश्वनाथ गुरव, महेश रेडेकर ,प्रदीप गावडे, विठ्ठल रेम्बोळकर ,अक्षय गावडे व शिवभक्त मंजुनाथ शिंदे ,अशोक सोनवणे, संदीप तेजम व शिवमती रंजना पाटील,या सर्वांनी उपस्थित राहून निरोप समारंभ शुभेच्छा कार्यक्रम पार पाडला व दिल्ली येथील महा अधिवेशनास शुभेच्छा दिल्या.