सायकल वरून जात असताना टेम्पोची मागून सायकल स्वराला धडक बसून झालेल्या अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी पिरणवाडीत घडली .
याबाबत मिळालेली माहिती अशी की पिरणवाडी येथील रहिवासी असलेले शबीर नामक व्यक्ती नमाज पठण करण्यासाठी दर्गा येथे सायकल वरून जात असताना मागून टेम्पोची जोरदार धडक बसली .
यावेळी शबीर हे रस्त्यावर पडल्याने टेम्पोचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले त्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला .सदर अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटना स्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा केला.