सीमावासियांचा खळखळाट आज सायंकाळी साडेपाच वाजता पाहायला मिळणार आहे. सार्वजनिक वाचनालयाच्या आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानमालेत दुसऱ्या सत्रात हसवणूक कार्यक्रम पार पडणार आहे.
हास्य सम्राट अजितकुमार कोष्टी यांचा कार्यक्रम आज पार पडणार असून या कार्यक्रमाला सीमावासीय मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.
अजित कुमार कोष्टी यांनी सीमाभागातील अनेक ग्रामीण मराठी साहित्य संमेलनात आपली कला सादर केली आहे. तसेच आज पार पडणाऱ्या सार्वजनिक व्याख्यानमालेच्या दुसऱ्या सत्रात देखील ते आपल्या हास्याने सर्वांना खळखळून सोडणार आहेत.