22 एप्रिल ते 18 मे दरम्यान द्वितीय वर्षाची परीक्षा
कर्नाटकचे शिक्षण मंत्री बी सी नागेश यांनी एक महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे. त्यांनी पीयूसी द्वितीय वर्षाच्या परीक्षांची तारीख जाहीर केली आहे .त्यामुळे 22 एप्रिल ते 18 मे या कालावधीत. सदर आयोजित करण्यात आलेल्या परीक्षा होणार आहेत .
सदर होणार्या या परीक्षेवर देखील हिजाबवर बंदी देखील कायम ठेवण्यात आली आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्याला गणवेश देखील बंधनकारक केला आहे. PUC द्वितीय वर्षाची परीक्षा 22 एप्रिल ते 18 मे 2021-22 या कालावधीत होणार आहे. यासंदर्भात शिक्षणमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे .
परीक्षा SSLC मोडवर घेतली जाईल आणि विद्यार्थ्यांनी गणवेश परिधान करणे अनिवार्य असेल अशी त्यांनी सूचना केली आहे .तसेच परीक्षा केंद्रात हिजाबसह कोणत्याही धार्मिक पोशाखास परवानगी दिली जाणार नाही. जे विद्यार्थी गैरहजर राहतील त्यांची पुरवणी परीक्षा नेहमीप्रमाणे घेतली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे
तसेच परीक्षा सकाळी 10.15 ते दुपारी 1.30 या वेळेत असेल. एकूण 6,84,255 विद्यार्थी परीक्षेला बसणार असून यामध्ये 3,46,936 मुले आणि 3,37,319 मुलींचा समावेश आहे. एकूण 1076 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा होणार असून कला शाखेचे 2,28,167 विद्यार्थी, वाणिज्य शाखेचे 2,45,519 आणि विज्ञान शाखेचे 2,10,539 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.
एकूण ५२४१ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली असून हॉल तिकीट दाखविल्यानंतर त्यांना मोफत बससेवा मिळणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री बी सी नागेश यांनी दिली.