O निगेटिव्ह रक्त गट हा अत्यंत दुर्मिळ रक्तगट असल्याने या रक्तगटाची व्यक्ती सहजासहजी सापडत नाही. मात्र एका बालकाला o निगेटिव्ह रक्तगटाची गरज असल्याचे समजताच तालुका समितीचे युवा नेते आर्किटेक आर एम चौगुले यांनी ओ निगेटिव्ह रक्तगट देऊ केले आहे.
निटूर येथील पांडुरंग डांगे या सहा वर्षीय बालकावर उद्या हृदयशस्त्रक्रिया होणार असून त्याला तातडीने o निगेटिव्ह रक्ताची गरज होती. यावेळी ही माहिती चौगुले यांना समजताच बालकाच्या मदतीकरिता धावून आले आणि त्यांनी रक्तदान करून त्या बालकाला मदत केली.