३रे बेळगाव मराठी साहित्य संमेलन- २०२२
बेळगाव येथील अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद व मराठा मंदिर आयोजित तिसरे बेळगाव मराठी साहित्य संमेलन रविवार दिनांक 8 मे 2022 रोजी मराठी मंदिर बेळगाव येथे संपन्न होणार आहे.
या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष जेष्ठ साहित्यिक डॉ श्रीपाल सबनीस भूषविणार आहेत.सदर संमेलन दोन सत्रात असून सत्र दुसरे काव्य संमेलन आहे. या काव्य संमेलनात बेळगाव जिल्हातील नवोदित कवींना जास्तींन जास्त संधी मिळावी असा कार्यकारणी बैठकीत निर्णय घेण्यात आला.
यासाठी आपली स्वरचित दर्जेदार एक कविता खालील दिलेल्या या व्हॉटस्अप नंबर 9591929325 पाठवावीत.असे आवाहन राज्याध्यक्ष सीमाकवी रवींद्र पाटील व जिल्हाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण यांनी केली आहे. कविता पाठविण्याची अंतिम तारीख 28 एप्रिल 2022 रोजी पर्यंत आहे. याची नोंद घ्यावी.
अटी व शर्ती :
- कविता स्वरचित असावी.
- कविता 3 मिनिटात सादरीकरण होणारी असावी.
- कविता राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक सलोख्याचा भंग होणार नाही अशी असावी.
- कविता मराठी भाषेतूनच असावी.
- वेळेत आलेल्या व समितीने निवड केलेल्या कवितांना सादरीकरणासाठी संधी देण्यात .
- निवडीचे सर्व अधिकार निवड समितीस राहतील.
- बेळगाव सीमाभागातील कवींना प्राधान्य देण्यात येईल.
- कविता व्हॉट्सॲपवर पाठवितान टाईप किंवा कागदावर सुवाच्छ अक्षरात लिहून त्याचा फोटो पाठविताना स्पष्ट दिसेल असा पाठवावा.
- कवींनी आपला पत्ता व फोन नंबर कवितेच्या खाली लिहावा .
या बैठकीला कार्यकारणी जिल्हाध्यक्ष सुधीर चव्हाण , उपाध्यक्ष डी. बी.पाटील , राज्याध्यक्ष रवींद्र पाटील ,संजय गुरव , रणजीत चौगुले , मोहन पाटील , मोहन अष्टेकर व संजय मोरे तसेच महिला सदस्या अरुणा गोजे- पाटील , स्मिता चिंचणीकर , नेत्रा मेणसे , स्मिता मेंडके , सविता वेसने , रोशनी हुंद्रे उपस्थित होत्या.