बेळगावचे जिल्हाधिकारी तहसीलदार बूड आयुक्त यासह अन्य अधिकाऱ्यांनी बनावट कागदपत्रे तयार करून शेतजमिनीची बिगरशेती केली आहे. त्यामुळे या सर्वांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने या सर्वांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
बनावट कागदपत्रे तयार करून लेआउट नकाशा बांधकाम परवाना आणि इतर बनावट कागदपत्रे जय किसान बद्दल तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे शहरातील उच्च पदाधिकाऱ्यांसह आयुक्तांवरही काल रात्री न्यायालयाच्या आदेशानुसार मारुती पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रयत संघाचे राज्याध्यक्ष सिद्धगौडा मोदगी यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
मृत व्यक्ती जिवंत असल्याचे भासवून सर्वे नंबर 698/1 ही जमीन एन ए करून घेण्यात आली. त्याचबरोबर बेकायदेशीर भाजीमार्केट साठी परवानगी आणि बिगर शेती सह इतर प्रक्रिया पार पाडण्यासाठी अन्य कागदपत्रांची ही तयारी केली. तसेच मृताच्या नावे असलेले संपूर्ण जमीन ताब्यात घेण्यासाठी अधिकाऱ्यांकडून बेकायदेशीर आदेश करून घेण्यात आला यामध्ये जय किसान मार्केट सुरू करण्याचा उद्देश होता त्यामुळे या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कारवाई करावी तसेच बनावट कागदपत्रांची तपासणी करावी अशी मागणी सिद्ध गौडा मोदगी यांनी केली आहे.
जय किसान भाजी मार्केट प्रकरणी वेगवेगळे प्रकरण समोर येत असून अधिकाऱ्यांनी केलेल्या या गौडबंगाल यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.त्यामुळे जय किसान च्या व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
सदर 34 गुंठे जमिनीसाठी जय किसान होलसेल व्हेजिटेबल मर्चंट असोसिएशनचे दिवाकर पाटील करीनसाब बागबान राम गणेश हावळ उमेश कल्लाप्पा पाटील आणि अन्य पदाधिकाऱ्यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी तहसीलदार अधिकाऱ्यांकडे येण्यासाठी अर्ज केला होता. यावेळी अधिकाऱ्यांनी यामध्ये गौडबंगाल केल्याने यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.