बेळगावला गरिबांचे महाबळेश्वर म्हणून ओळखण्यात येते .मात्र आता बेळगावच्या तापमानात दिवसेंदिवस कमालीची वाढ होताना दिसून येत आहे .सध्या बेळगाव चा तापमान 40 डिग्री 25 च्या आसपास असल्याचे दिसून येत आहे .
या वाढत्या उन्हाचा त्रास सोसण्यासाठी नागरिक गॉगल चष्मा रुमाल छत्री आधीचा वापर करताना दिसत आहेत .तसेच वाढत्या गरमीमुळे शीतपेयांच्या दुकानांमध्ये गर्दी दिसून येत आहे .शीतपेयांमध्ये कोकम लिंबू सोडा आणि आदी वस्तूंना मागणी वाढली आहे .
सध्या गर्मी सहन होत नसल्याने लहान मुले युवक आणि काही नागरिक तलाव विहिरी आदी ठिकाणी थंड पाण्याची आंघोळ करताना दिसून आले गेल्या काही दिवसांपासून बेळगावच्या शहरांमध्ये तापमान कमालीचे वाढल्यामुळे आहे सायंकाळी वळवाचा अवकाळी पाऊस येत आहे .
त्यामुळे नागरिकांचा गोंधळ होत आहे या वाढत्या गरमीमुळे शेतकऱ्यांना शेतामध्ये काम करणे कठीण होत आहे त्यामुळे भल्या पहाटे शेतामध्ये जाऊन काम करताना शेतकरी वर्ग दिसत आहे. या गर्मी पासून बचाव करण्यासाठी नागरिक शक्यतो सकाळी आणि सायंकाळी बाजारपेठेमध्ये येत असल्याचे दिसत आहे या वाढत्या उन्हाचा पासून बचाव करण्यासाठी फॅन आधी चा वापर करताना कार्यालयामध्ये घरांमध्ये नागरिक दिसत आहेत.