बेळगाव शहरातील एक अनोळखी तरुणी काल सकाळी अकराच्या सुमारास बेळगाव शहरात बसस्थानकाजवळ फिरत होती.याची माहिती शहरातील नागरिकांना समजल्यानंतर अभय बेळगुंदकर,गुरुराज बनाजी,सुदीर शहापूरकर,प्रशांत बागोजी यांनी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर यांना दिली.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर यांनी वैशाली कदम या १६ वर्षीय मुलीला मदत केली .ती महाराष्ट्रातील एका वेगळ्या ठिकाणाहून स्वतःहून बेळगावला आली होती.
सुरेंद्र शिवाजीराव अनगोळकर यांच्या मदतीने मुलीला बेळगाव येथील महिला पोलीस ठाण्यात नेण्यात आले .एएसआय बी एन हिरेमठ व महिला पोलीस ठाण्याचे कर्मचारी यांनी तपास केल्यानंतर मुलीचे काका महादेव केरेकर यांना बोलावून मुलीला त्यांच्या स्वाधीन केले .