श्री चांगळेश्वरी श्री कलमेश्वर आणि श्री महालक्ष्मी यात्रेनिमित्त आज मध्ये बेमुदत निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मैदानातील लोकमान्य केसरी किताबासाठी प्रथम महान भारत केसरी पंजाब केसरी पंजाब चा पै प्रीतपाल फगवाडा आणि भारत केसरी हिंद केसरी पै भूपेंद्र अजनाला यांच्यात रंगणार आहे.
तसेच येथील मैदानात वेगवेगळ्या जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले असून लोकमान्य केसरी किताब हा कोण पटकावणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या जंगी कुस्त्यांच्या मैदानात प्रमुख पाहुणे म्हणून लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर उपस्थित राहणार आहेत.
तसेच अनेक मान्यवर या आयोजित केलेल्या बेमुदत निकाली कुस्त्यांचे जंगी मैदानात हजर राहणार असून कुस्ती शौकिनांनी या कुस्ती मैदानाचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.