रेल्वेमार्ग दुपदरीकरण कामासाठी काल दिनांक २९ एप्रिल रोजी सकाळी ८ पासून ते आज दिनांक ३० एप्रिल रोजी सकाळी ८ पर्यंत तानाजी गल्ली व फुलबाग गल्लीनजीक फाटक (लेव्हल क्रॉसिंग फाटक क्रमांक ३८६) बंद ठेवण्यात आले होते.
तर आता उद्या रविवारी दिनांक १ मे रोजी सकाळी ८ ते सोमवारी (ता. २) सकाळी ८ पर्यंत पहिले रेल्वेफाटक बंद करण्यात येणार आहे .रेल्वे विभागाने रेल्वेमार्ग दुपदरीकरणाचे काम सुरु केले आहे. त्यामुळे पहिले रेल्वे फाटक (लेव्हल क्रॉसिंग फाटक क्रमांक ३८३)
चोविस तासांसाठी बंद राहणार आहे.
यासंबंधी शहर पोलीस आयुक्त कार्यालयातून परवानगी घेण्यात आली आहे. सदर २४ तासांच्या काळासाठी वाहनचालक, सायकलचालक, पादचाऱ्यांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे हुबळी रेल्वे प्रशाननाने कळविले आहे.