No menu items!
Thursday, December 5, 2024

व्हॉल्वची दुरुस्ती करण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष

Must read

बेळगाव :

एकीकडे पाणी वाचवा असा संदेश देण्यात येतो. तर दुसरीकडे पाण्याचा अपव्यय केला जातो. येथील न्यू गांधी नगर जुना फुल मार्केटकडे जाणाऱ्या रस्त्यावरती पाण्याच्या व्हॉल्वला गळती लागल्याने पाण्याचा अपव्यय होत आहे. त्यामुळे रोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे त्यामुळे नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

येथील पाण्याच्या तीन व्हॉल्वला गळती लागली आहे. मात्र ही गळती निवारण्याकडे पाणीपुरवठा मंडळाचे साफ दुर्लक्ष झाले असल्याने येथून ये-जा करणार्‍या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

सदर परिस्थिती गेल्या महिन्याभरापासून अशीच असून याच्या दुरुस्तीकडे महापालिकेने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे संबंधितांनी याकडे लवकरात लवकर लक्ष देऊन येथील समस्या मार्गी लावावी अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!