1986 मध्ये कर्नाटक सरकारने सीमा भागामध्ये कन्नड सक्ती लागू केले त्या विरोधात सीमा भागातील जनतेने तीव्र आंदोलन केले मात्र या घेण्यात आलेल्या आंदोलनात अनेक जण हुतात्मे झाले. त्यामुळे या सर्वांना अभिवादन करण्यासाठी एक जून रोजी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने करण्यात आली आहे
हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीने बैठक घेऊन हा निर्णय घेतला आहे. तसेच या बाबत जनजागृती प्रत्येक गावात मध्ये देखील करण्यात येत आहे.
यावेळी बैठकीस माजी आमदार मनोहर किणेकर माजी जिल्हा पंचायत सरस्वती पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी बैठकीला तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.