बेळगाव
कोरोना ची तिसरी लाट मुलांवर आली असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून शाळांना सहा दिवसांसाठी सुट्टी देण्यात आली होती .कोरोनाची लागण झाल्याने बंद होणाऱ्या शाळांची संख्या वाढू लागली असून तालुक्यातील दोन शाळा सहा दिवसांकरिता बंद करण्यात आल्या होत्या . कॅम्प येथील सेंट मेरीज इंग्रजी माध्यम शाळा आणि उचगाव येथील मळेकरणी हायस्कूल व के के कोप्प येथील सरकारी शाळेमध्ये शिक्षकांनी कर्मचाऱ्यांना तसेच विद्यार्थ्यांनादेखील कोरोना ची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर शाळांना सुट्टी देण्यात आली होती .
सध्या कोरोनाचे संकट वाढत असले तरी शाळा सुरू ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना एकमेकांच्या संपर्कात आल्यामुळे सर्दी खोकला ताप यासारखी लक्षणे आढळून येत आहे. त्यामुळे सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची काळजी घेणे गरजेचे बनले आहे.
तसेच ज्या शाळांमध्ये विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत त्या शाळा सुरु करण्यापूर्वी तेथील निर्जंतुकीकरण व इतर स्वच्छतेची कामे हाती घेण्यात आली आहेत. गेल्या सहा दिवसांपूर्वी आरोग्य खात्याच्या सूचनेनंतर दहा दिवस शाळा बंद ठेवण्यात आल्या होत्या.तर आजपासून या शाळा पुन्हा पूर्ववत सुरू झाल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे.