बेळगाव – चार वर्षांतून होणारी व्याघ्रगणना उद्या 4 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. बेळगाव विभागीय वनक्षेत्राच्या खानापूर तालुक्यातील जंगलात वाघांचे वास्तव्य आहे.भिमगड संरक्षित अभयारण्य नागरगाळी, कणकुंबी,जांबोटी आदी ठिकाणच्या जंगलात लाईन मेथड आणि कॅमेरा ट्रॅप पद्धतीने वाघांची गणती करण्यात येणार आहे.
पंचेचाळीस दिवस चालणारी ही गणना राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने द्वारे स्थानिक व वन कर्मचाऱ्यांच्या मदतीने करण्यात येणार आहे. 2015- 16 साल च्या राष्ट्रीय वन्य प्राणी गणती मध्ये भीमगड अभयारण्य सह नागरगाळी, जांबोटी आणि कणकुंबी या क्षेत्रात सात पट्टेरी वाघांचे अस्तित्व असल्याचे स्पष्ट झाले होते. त्यावेळेस कॅमेरा ट्रैप आणी पायांच्या ठशां वर ही गणती झाली होती. आता सध्याही संख्या बारा ते पंधरा वर जाऊन पोहोचली आहे. व्याघ्रगणना रेषा विभाजन आणि कॅमेरा ट्रेकच्या चार पद्धतीतून होणार आहे.