बेळगाव आणि परिसरातील हजारो सभासदांच्या विश्वासाच्या आणि सहकार्याच्या जोरावर श्री तुकाराम बँक एका 71 वर्षात पदार्पण करत आहे. बँकेला अर्थ वर्ष काळात 62 लाख 30 हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला आहे. अशी माहिती बँकेचे चेअरमन प्रकाश मरगाळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
यावेळी बँकेच्या संचालक प्रदीप ओऊळकर बँकेचा लेखाजोखा मांडताना म्हणाले, सध्या बँकेचे 8986 सभासद आहेत. बँकेचे शेअर भांडवल 1 कोटी, 36 लाख,40 हजार, 500 रुपये इतके आहे. बँकेकडे 7 कोटी, 25 लाख,44 हजार रुपये राखीव निधी आहे.
बँकेकडे 51 कोटी 62 लाख 47 हजार रुपयांच्या ठेवी आहेत. बँकेने 21 कोटी 80 लाख 78 हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे. बँकेकडे 63 कोटी 69 लाख 73 हजार रुपयांचे खेळते भांडवल आहे.बँकेची ऑडिट वर्गवारी ब वर्गात करण्यात आली आहे. चालू वर्षात बँकेला 65 लाख 30 हजार 401 रुपये निव्वळ नफा मिळाला आहे.
यावर्षी 14 टक्के लाभांश देण्याचा ठराव बँकेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला आहे. असेही ओऊळकर यांनी सांगितले.
यावेळी पुढे बोलताना अध्यक्ष प्रकाश मरगाळे म्हणाले, रिझर्व बँकेच्या जाचक अटी आणि निर्बंधांमुळे सहकार क्षेत्राला मोठ्या अडीअडचणींचा सामना करावा लागत आहे. केवळ सभासदांचा विश्वास आणि सहकार्यावर सहकारी बँका आणि पतसंस्था तग धरून आहेत. बँकेच्या वतीने सभासद आणि जनतेच्या हिताच्या दृष्टिकोनातून हाती घेण्यात येणार्या अनेक योजना केंद्रांच्या जाचक नियमामुळे राबविणे कठीण झाले आहे. तारण कर्ज देण्याच्या पद्धतीतही केंद्र सरकारने नवी पद्धत अवलंबल्यामुळे कर्जदारांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
वेळेत फी भरता येत नसल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.याकडे लक्ष देऊन आगामी काळात इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वेळेत शाळेची फी अदा करता यावी. यासाठी त्यांच्या पालकांना अत्यंत कमी व्याजदराने कर्ज देण्याच्या प्रस्ताव वार्षिक सर्वसाधारण सभेत ठेवण्यात आला आहे. सदर योजनेचा लाभ तळागाळातील आर्थिक दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना होणार आहे. असेही मरगाळे यांनी स्पष्ट केले.
पत्रकार परिषदेला संचालक अनंत जांगळे, राजू मर्वे, प्रवीण जाधव, संजय बाळेकुंद्री, सुनील आनंदाचे, मोहन कंग्राळकर, व्यवस्थापक परिंद जाधव उपस्थित होते.