कोगनोळी चेकपोस्टवर कर्तव्यावर असलेल्या निप्पाणी पोलिसांनी बनावट RTPCR प्रमाणपत्रे तयार केल्याप्रकरणी तब्बल 12 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
सरकाने दिलेल्या निर्देशानुसार , महाराष्ट्रातून कर्नाटक राज्यात प्रवेश करणाऱ्या सर्वांकडे कोविड निगेटिव्ह प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. मात्र एका खाजगी बसच्या सकाळी 4 वाजता नियमित तपासणी दरम्यान, पोलिसांना 12 व्यक्तींकडे खोटे RTPCR अहवाल असल्याचे आढळले.त्यामुळे त्यांच्याविरुद्ध नो-एंट्री-आरटीपीसीआर
गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी ३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.